Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमफैजपूरयावल

कुपनलिकेची नोंद करण्यासाठी एक हजारांची लाच; आमोदा तलाठ्याला एसीबीची अटक

फैजपूर. मंडे टु मंडे न्युज || सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी तडजोडीनंतर एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आमोदा येथील तलाठ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. शैलेश झोटे असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी तक्रारदार शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली होती. सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद करण्याच्या कामासाठी तलाठी शैलेश झोटे यांनी लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.


ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन आमोदा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या तलाठी कार्यालयाजवळ पोहोचला. यावेळी तलाठी झोटे यांनी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच तक्रारदाराने एसीबी पथकाला इशारा केला. त्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत तलाठी झोटे यांना ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे यावल तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या महसूलविषयक कामांसाठी लाचेची मागणी केल्याचा प्रकार समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे.ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!