भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडा

तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा, कौटुंबिक छळ, मारहाण, धमकीसह पाच लाख रुपयांची मागणी

जळगाव. मंडे टु मंडे न्युज || अंमळनेर येथील ३२ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळ, मारहाण, धमकी, पैशांची मागणी तसेच तिहेरी तलाक दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.४७ वाजता करण्यात आली.

तक्रारीनुसार, विवाहानंतर संबंधित महिलेला सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. तसेच आरोपींनी संगनमताने तिच्याकडे पाच लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

‘तलाक, तलाक, तलाक’ म्हणत तलाक दिल्याचा आरोप
तक्रारीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी महिलेला धमकी देण्यात आली. याचवेळी पतीने ‘तलाक, तलाक, तलाक’ असे उच्चारून तिला तलाक दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे चोपडा शहर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम 85, 296, 318(2), 131, 115(2), 351(2) आणि 3(5) तसेच मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) अधिनियम, 2019 मधील कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) अधिनियम, 2019 नुसार तत्काळ आणि अपरिवर्तनीय तलाक (तलाक-ए-बिद्वत) उच्चारणे किंवा अशा प्रकारे तलाक देण्याची घोषणा करणे कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरते.

या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलिसांकडून सुरू आहे. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार जगनाथ अशोक पाटील करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!