ब्रेकिंग : चिनावल मध्ये तरुणाची गोळी झाडून आत्महत्या ; गावठी कट्ट्याचा वापर
सावदा. ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज || रावेर तालुक्यातील चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाने गावठी कट्ट्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (६ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने चिनावल परिसरात खळबळ उडाली आहे.
निमल युवराज महाजन (वय २७, रा. चिनावल, ता. रावेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.
मृताच्या चेहऱ्यावर उजव्या डोळ्याजवळ अंदाजे ६ मिलिमीटर आकाराचे गोलाकार छिद्र आढळून आले. या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ग्रामीण रुग्णालय, सावदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या लेखी मेमोवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २२/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


