कटनी-भुसावळ एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल
भुसावळ,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | कटनी-भुसावळ एक्सप्रेस भुसावळ विभाग संचलित गाडी क्रमांक १९०१४ च्या खंडवा ते भुसावळ या दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून हा बदल दि.१ सप्टेंबर पासून प्रभावी राहील.
असे राहील वेळापत्रक
खंडवा स्थानक आगमन ३.१५ वाजता, प्रस्थान ३.२० वाजता, बरगाव गुजर स्थानक आगमन ३.२९ वाजता, प्रस्थान ३.३० वाजता, डोंगरगाव स्थानक आगमन ३.५४ वाजता, प्रस्थान ३.५५ वाजता सागफाटा स्थानक आगमन ४.०४ वाजता, प्रस्थान ४.०५ वाजता, नेपानगर स्थानक आगमन ४.१८ वाजता, प्रस्थान ४.२० वाजता, बुरहानपूर स्थानक आगमन ४.४२ वाजता, प्रस्थान ४.४५ वाजता, वाघोडा स्थानक आगमन ४.५९ वाजता, प्रस्थान ५.०० वाजता, रावेर स्थानक आगमन ५.०९ वाजता, प्रस्थान ५.१० वाजता, निंभोरा स्थानक आगमन ५.१९ वाजता, प्रस्थान ५.२० वाजता, सावदा स्थानक आगमन ५.३९ वाजता, प्रस्थान ५.४० वाजता, भुसावळ स्थानक आगमन ६.३५ वाजता. प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी या नव्या वेळेनुसार धावणार.


