लाडकी बहीण योजना बंद पडणार? काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | निवडणूक संपल्यावर योजना बंद होतील असं विरोधी पक्षांसह अनेकजण म्हणत होते. त्यातल्यात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक भावांनी आणि अपात्र बहिणींनीही घेतल्याचं उघड झालं आहे. त्या मुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे. तसेच लाडक्या बहिणीच्या आर्थिक ओझ्यामुळे इतर योजना गुंडाळाव्या लागल्याने अनेक नेतेही उघडपणे टीका करत आहेत. आणि या सर्व गोंधळामुळे ही योजना बंद पडणार का? अशी चर्चा रंगली आहे.
त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुढील पाच वर्षं सुरु राहील असं जाहीर केलं आहे. पाच वर्षं आपली एकही योजना बंद होऊ देणार नाही. पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं, तर पुढची पाच वर्षही असेल,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
जोपर्यंत बहिणींचे आशीर्वाद भावांच्या पाठीशी आहेत, तो पर्यंत काहीच होणार नाही. २०२९ मध्ये तर तुम्हीच सत्तेत येणार आहात. अभुतपूवर्व यश मिळाल्याने तुम्ही आनंदी आहात. पण अजूनही काही लोकांचं समाधान झालेलं नाही. तोंडावर पडले, रोज म्हणतात वोटचोरी, यांचं डोकं चोरी झालं आहे. लाडक्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला.
राखी पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने दादरच्या योगी सभागृहात राखी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान ते बोलत होते.

