पदाधिकाऱ्यांशी चर्चा व अंतर्गत मिटींगामुळे सावदा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अभ्यागतांसाठीचा निश्चित वेळ देऊ नये…?
सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | प्रशासकीय काळात सावदा नगरपरिषदेतील विकास कामाच्या वाटपासह अनागोंदी कारभारावर सर्वच थरातून वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत फेरफार करून ठरविकांचे खिसे भरण्यात आल्याची टीकेची झोड उठत आहे. मुख्याधिकाऱ्यांची ठरविकांवरतीच मेहरबानी का ? पुढील भागात… काही सवाल क्रमश:)
….असे असताना आता सावदा नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी भुषण वर्मा यांच्या कक्षा बाहेर अभ्यागतांसाठी भेटण्याची वेळ दुपारी १२ ते २ असे लिहिल्यावर सदर वेळेत शहरातील समस्याग्रस्त नागरिक मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी येतात मात्र अंतर्गत मिटींग व राजकीय चर्चेच्या नावाखाली येथील मुख्याधिकारी अभ्यागतांना सदरील वेळ देत नसल्याचा प्रकार दिवसाआळ घडत असल्याची ओरड ऐकण्यास मिळते. तसेच हाच प्रसंग पत्रकारांना सुद्धा आला आहे. पत्रकारिता हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. आवश्यकतेनुसार पत्रकार केव्हाही भेटू शकतात मात्र पत्रकाराना सुद्धा तास, दीड तास वाट बघावी लागत आहे.
यामुळे जनतेच्या मनात सत्ताधारी सह मुख्याधिकार्याँबद्दल दिवसांदिवस नाराजी व रोषात वाढ होत असल्याचे जाणवते. तसेच सदरील परिस्थितीमध्ये बदल होईल या शुद्ध अपेक्षेने वरिल माहितीसह तोंडी तक्रार वेळोवळी मुख्याधिकाऱ्यांना भेटून नागरिकांनी केलेल्यावरही आजपर्यंत परिस्थिती”जैसे थे” चीच दिसून येते. मग शहरवासीय नागरिक मुख्याधिकाऱ्याना भेटतील कधी ? या मुळ नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
असे प्रकार वारंवार होत असल्याची ओरड होत असून याप्रकरणी आता मुख्याधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले आहे. या म्हटलेनुसार सहा मागण्या करण्यात आल्या आहेत. १)उभ्यागतांसाठी मुख्याधिकारी महोदयांनी निश्चित केलेल्या दुपारी १२ ते २ यावेळेत कोणतीही अतंर्गत मिटींग व राजकीय चर्चा करु नये.२)महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०२३/प.क्रं.२६/१८-र,दिनांक २८ मार्च २०२३.या शासन आदेशाची व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या संयुक्त भेटीचा (जी.आर)बाबत सुद्धा काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. ३)मुख्याधिकारी कक्षा बाहेर रितसर अभ्यागत नोंदवही ठेवण्यात यावी. ४)नगरपालिकामध्ये दफ्तर दिरंगाई कायदा२००५,लोकसेवा हक्क कायदा २०१५,महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम १९७९ नुसार,लोकसेवकांनी सत्ताधारीसाठी सामान्य जनतेच्या तक्ररारी,निवेदन, समस्या इत्यादी कामाकडे किंवा जनतेकडे दुर्लक्ष करता कामा नये ५)नियमानुसार नगरपालिकामध्ये नागरिकांची सनद लावण्याची उपाययोजना करण्यात यावी. ६)तसेच कामानिमित्त मुख्याधिकारी यांची भेट घेण्यासाठी आलेले विरोधी गटाचे नगरसेवक यांना अधीक वेळ मुख्याधिकारी कक्षा बाहेर प्रतिशा करावी लागते. तसेच पत्रकारांना सुद्धा भेटण्या साठी वाट बघावी लागते ही मोठी आच्चर्याचीही व खेदाची बाब आहे.
अशा मागण्या शहरातील जागृत नागरिक फरीद शेख, युसूफ शाह, इरफान खान यांनी जनहितासाठी दि.८ मार्च २०२६ रोजी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. तसेच मागण्या मान्य न झाल्यास १ मे रोजी पालिका समोर धरणे आंदोलन केले जाईल. असा इशाराही निवेदनात दिला आहे. त्यामुळे पुढील भागात:…. नगरपरिषदेतील प्रशासक काळातील काही सवाल क्रमश:)

