५ लाखांची लाचेची मागणी, ३ लाखात तडजोड, उपनिबंधकासह खासगी व्यक्तीला दीड लाखांची लाच घेताना अटक, जळगाव एसीबी ची कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नुकतीच जळगाव शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने ५ लाखांची लाच घेतल्याची घटना ताजी असताना आता सहकारी संस्थेच्या चौकशी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव येथील उपनिबंधकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तडजोडीनंतर ३ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचेवर अवैध
सावकारी धंदा कारवाईच्या अनुषंगाने कारवाई झाली होती. सदरची सुनावणी ही उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका, जळगाव येथे सुरू होती. तक्रारदार हे त्यांचेविरूध्द सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशी प्रकरणी विचारपुस करण्यासाठी व पुढील सुनावणीची तारीख विचारण्यासाठी उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव या कार्यालयात गेले असता तेथील श्री. जगदिश बारी, उपनिबधंक, सहकारी संस्था जळगाव यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुध्द गुन्हा दाखल होवु नये, म्हणुन अवैध सावकारी बाबतचा चौकशी अहवाल अनुकुल पाठविण्यासाठी ५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. १८ मे २०२६ रोजी ला.प्र. वि. जळगाव घटकास तक्रार दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १८ मे २०२६ रोजी पंचासमक्ष उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका जळगाव येथे लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमावली असता जगदीश बारी. उपनिबधंक, सहकारी संस्था जळगाव.यांनी तक्रारदार यांचेविरुध्द अवैध सावकारी बाबतचा अहवाल अनुकुल पाठविण्यासाठी प्रथम ५ लाख रूपयांची मागणी करून तडजोडीअंती ३ लाख रू. लाचेची मागणी केली. तसेच पडताळणी दरम्यान उप निबंधक जगदीश बारी हे बोलले की, तुम्ही मागच्या प्रकरणाच्या वेळेस वकील लावला म्हणुन आमचे खुप मोठे नुकसान केले, म्हणुन नकारात्मक अहवाल दिला होता. परंतु आता अनुकुल अहवाल पाठवितो, असे सांगुन
लाचेच्या मागणीं पैकी पहीला
हप्ता १ लाख ५० हजार रू.
देविदास धनसिंग पाटील, वय ४४ वर्षे, मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन, यांचेकडे दिनांक २० मे २०२६ रोजी देण्यास सांगितले.
त्याप्रमाणे आज दिनांक २० मे २०२६ रोजी सापळा कारवाई आजमावली असता( १ ) जगदीश बाबुराव बारी, वय ५६ वर्षे, पद- उप निबंधक, उप निबंधक सह संस्था,जळगाव, रा. शांतीनगर, यावल रोड, भुसावळ, (वर्ग-०१) (२). देविदास धनसिंग पाटील, वय ४४ वर्षे, मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव. (खाजगी इसम) यांनी तक्रारदार यांचेकडुन लाचेची १,५०,०००/- रू. रक्कम उपनिबंधक (परसेवा), सहकारी संस्था, जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लि., जळगाव, तिसरा मजला, बी.जे. मार्केट, जळगाव येथे स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई पर्यवेक्षण अधिकारी :- श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. सापळा अधिकारी: रेश्मा अवतारे, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव सापळा पथक :-पो. नि. हेमंत नागरे, पोहेका/बाळु मराठे, मपोहेका / संगिता पवार, पो. कॉ/मनोज पाटील व पो. कॉ. सचिन चाटे सर्व नेमणुक ला.प्र.वि. जळगांव

