भीम आर्मी भारत एकता मिशन ची जिल्हा समिक्षा बैठक संपन्न
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भीम आर्मी (भारत एकता मिशन) जळगाव जिल्हा येथे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक मा.दिपक जी भालेराव व मा.राहुल सुभाऊ वाघ यांच्या निरीक्षण अंतर्गत व धुळे जिल्हा प्रमुख सर्वांचे लाडके,रावण म्हणून प्रचलित मा.संजय भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगांव जिल्ह्याची समिक्षा बैठक भुसावळ शहरातील शासकीय विश्राम गृह येथे पार पडली.
भिम आर्मी भारत एकता मिशन,संस्थापक व आजाद समाज पार्टी राष्ट्रीय प्रमुख, बहुजननायक, संघर्षयोद्ध, खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांचा सामाजिक कार्यालेख अविरत वाढत असतांना.भिम आर्मी भारत एकता मिशन, महाराष्ट्र राज्यात देखील अशीच जोमाने वाढावी या अनुशंगाने महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. अनिलजी धेनवाल साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात समिक्षा बैठका होत असून, त्याचाच एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्र निरीक्षक मा.दिपक जी भालेराव व मा.राहुल भाऊ वाघ यांच्या निरीक्षण अंतर्गत व धुळे जिल्हा प्रमुख सर्वांचे लाडके, रावण म्हणून प्रचलित मा.संजय भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगांव जिल्ह्याची समिक्षा बैठक भुसावळ शहरातील शासकीय विश्राम गृह येथे पार पडली.
सदर बैठकीसमयी मान्यवरांचे स्वागत करून जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील कार्य आढावा घेऊन निरीक्षकांनी मार्गदर्शन केले व आगामी निवडणूक लक्षात घेऊन काही मार्गदर्शक सूचना केल्या,तसेच बैठकीचा योग साधून काही नवीन प्रवेश देखील करण्यात आले.शेवटी भिम आर्मी भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करीत त्यांना शब्द दिला की ज्याप्रमाणे आजवर जिल्ह्याचे काम राहिले पुढे याहीपेक्षा जास्त जळगांव जिल्हा सामाजिक कार्यात अग्रेसर राहील
सदर प्रसंगी भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगांव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते व बैठकीमुळे त्यांच्यात नवा जोश संचारल्याचे दिसून येत होते

