भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर येथे ‘अभियांत्रिकी दिन’ उत्साहात संपन्न

भोर. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज. | रावेर येथे रावेर, यावल, मुक्ताईनगर व फैजपूर इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभियांत्रिकी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती व पदाधिकारी
अध्यक्ष: आर. आर. पाटील सर, उपाध्यक्ष (विभागनिहाय):
राजेश सोनवणे (रावेर विभाग), संदीप बागुल (मुक्ताईनगर विभाग), शेख मोहसीन (फैजपूर विभाग) यांचे सह कार्यक्रमास परिसरातील स्थापत्य व तांत्रिक क्षेत्रातील अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्येइंजि. मयूर कासार,इंजि. मयूर ढाके,इंजि. विकास धनगर,इंजि. जितेंद्र पाटील,इंजि. गुणवंत महाजन,इंजि. मनीष अग्रवाल, इंजी.चेतन सोनार , इंजि.धीरज मिसर, इंजी. पंकज गलवाडे.

या वेळी अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, दर्जेदार साहित्याचा वापर आणि क्षेत्रीय आव्हानांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवर व अभियंत्यांचा सन्मान करून भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. चारही तालुक्यांतील अभियंत्यांना एकाच छताखाली एकत्र आणणारा हा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!