भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorizedमुक्ताईनगरसामाजिक

अखेर पत्रकार बांधवच बुजवणार भुसावळ रोडवरील “तो” जिवघेणा खड्डा!

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | भुसावळ ते कोथळी रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एक मोठा खड्डा पडलेला असून, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून अपघाताची शक्यता देखील वाढली आहे.

या समस्येची वारंवार दखल घेत पत्रकार बांधवांनी अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, मात्र संबंधित खात्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासन गाढ झोपेतच असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निष्क्रियता पाहून अखेर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेल्या पत्रकार बांधवांनी स्वतःच पुढाकार घेत, जनहितासाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्याचा उपक्रम :
मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, भुसावळ रस्त्यावरील तो जीवघेणा खड्डा पत्रकार बांधव स्वतःच्या पुढाकाराने बुजवणार आहेत.

या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमात सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करतात, पण यावेळी त्यांनी फक्त आवाज उठविण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीचा धडा दाखवला आहे.आता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!