भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुक्यातील २२ वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार

रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रावेर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली.

या संदर्भात संशयीताविरोधात रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे .

शुक्रवार रोजी रावेर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय विवाहिता आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधत आरोपी अरुण भागवत यवतकर याने जबरदस्तीने घरात प्रवेश करीत दरवाजा लावून घेत पीडीतेवर अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने रावेर पोलिस ठाण्यात अरुण भागवत
यवतकर याचे विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी यवतकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक सखाराम कांबळे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!