राज्यातील सर्व शाळांसाठी दप्तर धोरण लागू : सहावी ते आठवी साठी वर्षातून दहा दिवस ‘दप्तरमुक्त’
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | विद्यार्थ्यांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास टाळण्यासाठी दप्तराचे ओझे कमी करण्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. तसेच, इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी वर्षातून दहा दिवस दप्तरमुक्त दिवस पाळणे बंधनकारक आहे.
शिक्षण संचालकांनी नवीन शिक्षण धोरणानुसार ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नवीन शिक्षण धोरणाच्या आदेशानुसार सरकारी व खासगी शाळांसाठी सर्व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे. दप्तरविरहित या १० दिवसात कला, संगीत भेटी, प्रश्नमंजुषा, विज्ञान कार्यक्रम, कथा वाचन, नाटक, बागकाम, स्थानिक कारागिरांशी संवाद असे उपक्रम राबवावेत.
दप्तराचे ओझे नको, अनुभवातून शिक्षण हवे!
पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांना दप्तर नसावे. वर्गनिहाय दप्तर वेळापत्रक आवश्यक आहे. ही व्यवस्था शाळांना सक्तीची आहे. याची नियमित तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी शाळा भेटी देऊन करायची आहे.
दप्तरांच्या अधिक ओड्यामुळे शारीरिक, मानसिक त्रास विद्यार्थ्यांना होतो. त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, ते चिडचिडे होतात. त्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता खालावते.
हे टाळण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळांना सक्त आदेश जारी केले आहेत.
इयत्तानिहाय दप्तराचे निश्चित वजन
पूर्व-प्राथमिक …दप्तर नाही
१ ली.- १.६ ते २.२ कि.ग्रॅ.
२ री-१.६ ते २.२ कि.ग्रॅ.
३री. – १.७ ते २.५ कि.ग्रॅ.
४ थी – १.७ ते २.५ कि.ग्रॅ.
५ वी. – १.७ ते २.५ कि.ग्रॅ.
६वी. – २ ते ३ कि.ग्रॅम
७ वी. – २ ते ३ कि.ग्रॅम
८ वी – २.५ ते ४ की.
९ वी२.- ५ ते ४.५ कि.ग्रॅ.
१० वी – २.५ ते ४.५ कि.ग्रॅ.
११ वी – ३.५ ते ५ कि.ग्रॅ.
१२ वी – ३.५ ते ५ कि.ग्रॅ.
या आदेशाची ठळक वैशिष्ट्ये
इयत्तानिहाय दप्तराचे वजन, नोंद ठेवणे बंधनकारक.
अनावश्यक पुस्तके, वह्यांना आळा; शक्यतो पुस्तके शाळेत कपाटात ठेवावीत.
दप्तरांचे ओझे कमी झाल्याने विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे.
शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. त्यामुळे घरून पाण्याच्या बाटल्या आणण्याची गरज विद्यार्थ्यांना उरणार नाही.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

