भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव जिल्हा पोलिसांच्या वतीने भव्य ‘पोलीस पाटील मेळावा’ संपन्न; ‘पोलीस पाटील मार्गदर्शिका’ पुस्तिकेचे प्रकाशन

जळगाव.मंडे टु मंडे न्युज | गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी येथे केले. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला भव्य ‘पोलीस पाटील मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या मेळाव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘पोलीस पाटील मार्गदर्शिका’ पुस्तिकेचे विमोचन कार्यक्रमादरम्यान पोलीस पाटलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ‘पोलीस पाटील मार्गदर्शिका’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पोलीस पाटलांचे दैनंदिन कामकाज, कायदेशीर अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामुळे गावपातळीवरील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती व स्पष्टता मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कर्तव्य, अधिकार अन् जबाबदारीचा महासंवाद            उपस्थित मान्यवरांनी पोलीस पाटलांशी संवाद साधताना सांगितले की, गावात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटना, संशयास्पद हालचाली आणि तंट्यांची माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात पोलीस पाटलांची भूमिका निर्णायक ठरते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस पाटलांच्या पाठीशी पोलीस प्रशासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!