हृदयद्रावक ; टायर फुटल्याने कार ने पेट घेतला, विवाहितेचा कार मध्येचं होरपळून मृत्यू
जामनेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक हृदयद्रावक घटना जामनेर तालुक्यात घडली. अचानक कार चे टायर फुटल्याने कार ने पेट घेतला. आणि विवाहितेचा कारमध्ये च होरपळून मृत्यू झाला. जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूरजवळ १० नोव्हेंबर रोजी दुपारी अपघात झाला. जान्हवी संग्राम मोरे (वय 21, मूळ रा. गुलखेडा जि. बुलढाणा) या विवाहित महिलेचा कार मध्येचं जागीच मृत्यू झाला. य
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामसिंग जालीमसिंग मोरे हे पत्नी जान्हवी मोरे सह चारचाकीतून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. त्यांची कार पिंपळगाव फाटा, पहूरजवळ आली असता, अचानक कारचा टायर फुटला. टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि ती महामार्गावरील दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारमधून तत्काळ धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.
घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी त्वरीत कारच्या पुढील काचा फोडून पती संग्राम मोरे यांना बाहेर काढले. त्या वेळी संग्राम मोरे यांनी आत मध्ये पत्नीही असल्याचे सांगितले. त्या वेळी बचावकार्य अधिक वेगाने सुरू झाले. उपस्थितांनी दगडांनी काचा तोडून जान्हवी यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.परंतु, तोपर्यंत कारला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि आग भडकत गेल्याने जान्हवी यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. परिणामी, जान्हवी मोरे यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला.
घटनास्थळी गाडीची आग विझविण्यासाठी वाकोद येथून टँकर व जामनेर नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडीही दाखल झाली. गाडी ला लागलेली आग विझल्यानंतर जान्हवी मोरे यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली.या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पहूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. संग्राम मोरे यांना जळगाव येथील शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

