राज्यात उष्णतेची लाट, तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पुढे…..
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र राज्यात तापमानात वाढ होताना दिसत असून दिवसेंदिवस उष्णतेचे चटके तीव्र होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून खानदेशात ४१ ते ४३ अंशांदरम्यान पारा जात आहे. राज्यात सर्वात जास्त शनिवारी उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात होते. तर जळगावचे तापमान ४३.४, नंदुरबार ४१ अंश, नाशिक मध्ये ४१ अंश सेल्सिअस नोंद झाली.या मुळे राज्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. महाबळेश्वर येथे सर्वांत कमी किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस होते. दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत असून. या हंगामातील हे उच्चांकी तापमान ठरले आहे. मालेगावला ४३.४, जळगावला ४३.३, तर छत्रपती संभाजीनगरला ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा ४० ते ४५ अंशांच्या पुढेच नोंदवला गेल्याने यंदा राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. महाराष्ट्रात सध्या विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) पसरली असून, अनेक ठिकाणी तापमान ४० ते ४५ अंश च्या पुढे गेले आहे. पुढील सात दिवस उष्णतेचा हा तडाखा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यामुळे उष्माघाताचा (Heat Stroke) धोका वाढला आहे. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, नागरिकांनी दुपारी बाहेर जाणे टाळावे व काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील अकोला, वाशिम, नागपूर येथे तापमानाचा पारा
वाढला असून कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्यातही उष्णतेची लाट सदृश परिस्थिती आहे.
नागरिकांनी घ्यायची काळजी:
दुपारी टाळा प्रवास: दुपारी १२
ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा
भरपूर पाणी प्या: तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी, लिंबू सरबत, ताक किंवा ओआरएस (ORS) प्या .
सुरक्षित कपडे: हलके, सैल आणि सुती कपडे वापरा.
उन्हात जाणे टाळा: उन्हात बाहेर जाणे अनिवार्य असल्यास डोके टोपी किंवा रुमालाने झाकून ठेवा.
प्रशासनाकडून लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

