भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

सक्षम नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा ; लालचंद पाटील यांच्या उमेदवारीला जिल्हाभरातून मागणी

नशिराबाद, मंडे टू मंडे न्यूज डॉ.दीपक लोखंडे | जळगाव जिल्ह्यात सध्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे. विविध स्तरांवरील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीसाठी एकमुखी मागणी होत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे.

दरम्यान, नशिराबादचे नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बोढरे यांनीही लालचंद पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व विधान परिषदेवर जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळत असून, वातावरणात उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून घडलेले लालचंद पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध पदांवर कार्य करताना ठसा उमटवला आहे. ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, नगरसेवक तसेच गटनेते म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळताना विकासाभिमुख भूमिका घेतली. लोकांच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेणे आणि निर्णयक्षम कार्यपद्धती ही त्यांची वैशिष्ट्ये मानली जातात.

भाजप संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय मानले जाते. तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवत त्यांच्याशी थेट संपर्क ठेवणे ही त्यांची जमेची बाजू असून, पक्ष अधिक सक्षम करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचीही चर्चा आहे.

एकूणच, लालचंद पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल आणि संघटन अधिक मजबूत होईल, अशी भावना सध्या जळगाव जिल्ह्यात व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!