भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

HSRP नंबर प्लेट : ३१ डिसेंबर हीच अंतिम मुदत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई | मंडे टु मंडे न्यूज |  राज्यातील सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट  (HSRP) बसविणे अनिवार्य असून, ३१ डिसेंबर २०२६ ही त्यासाठीची अंतिम मुदत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुदतीपूर्वी HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांवर १ जानेवारी पासून नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सरनाईक म्हणाले की, गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा गैरवापर होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनावर HSRP नंबर प्लेट असणे आवश्यक करण्यात आले आहे. यामुळे वाहनांची ओळख पटविणे आणि गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मोठी मदत होणार आहे.


राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे एक कोटी वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. नवीन वाहनांना शोरूममधूनच HSRP प्लेट दिल्या जातात. मात्र, जुन्या वाहनांपैकी केवळ ५५ ते ५६ टक्के वाहनांवरच HSRP बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित वाहनधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

याबाबत कोणालाही सूट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत सरनाईक म्हणाले की, मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधी असोत, सर्वांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींनाही नियमांचे पालन करावे लागेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!