भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

अन्यायग्रस्त टोकरी कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी उपोषण – संजय कांडेलकर

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती लालबहादूर शास्त्री जयंती या दिवसाच्या अवचित साधून संजय कांडेलकर यांनी कोळी समाजाला जातीचे दाखले मिळण्यासाठी अमरण उपोषण ची सुरुवात केली गेल्या कित्येक दिवसांमध्ये जातीने टोकरे कोळी ढोर कोळी आदिवासी कोळी आदींचा उल्लेख असून सुद्धा भुसावळ विभागीय अधिकारी 1950 चा पुरावा सादर करावा अशी त्रुटी काढून बाद करता ,दहा प्रकरण पैकी तीन प्रकरण निर्गमित केले जातात बाकीचे सात प्रकारचे रिजेक्ट केले जाते.


जीआर प्रमाणे नातेवाईकांचे शाळा सोडण्यात दाखला किंवा रहिवासी पुरावा महसूल पुरावा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चौकशी अहवाल जन्माच्या नोंदी , अर्जदाराकडून अहवाल न मागवता त्यावर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संजय कांडलकर यांचा प्रयत्न आहे जेणेकरून सर्व कोळी बांधवांना जातीचे दाखले अनुसूचित जमाती चे दाखले निर्गमित होण्यासाठी आम्हाला योग्य जन्माच्या नोंदी, आजोबांचा शाळा सोडण्या चा दाखला वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला इत्यादी पुरावे नसतील तर शपथपत्रावर लिहून दिल्या प्रमाणे नोंद दस्त योग्य आहे किंवा नाही सक्षम अधिकारी चौकशी करेल व गुणांवगुणांवरून दाव्याचा निर्णय देईल असा परिपत्रकात उल्लेख आहे तरी सदरील सर्व कोळी समाजाला जातीत दाखले निर्गमित होण्यासाठी हे अमरण उपोषण आहे आज पाचवा दिवस .

आज तहसीलदार गिरीश वखारे यांनी भेट घेतलेली आहे. उपस्थित संजय प्रल्हाद कोळी जयेश श्रावण तायडे, पंकज सुधाकर तायडे एच जी सपकाळे मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई मनसे शहराध्यक्ष मंगेश कोळी उपाध्यक्ष श्रीराम भोई सुनील कोळी विलास भिवसन कोळी तुकाराम रामकृष्ण कोळी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!