भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

नशिराबाद मध्ये अवैध गोवंश कत्तल, ९ आरोपींविरुद्ध गुन्हा ; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे अवैध गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तब्बल १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २८ मे २०२६ रोजी नशिराबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.निरीक्षक योगिता नारखेडे या पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, फातेमा नगर परिसरातील एका खुल्या जागेत काही इसम गोवंश जातीच्या जनावरांची अवैधरित्या कत्तल करून मांस विक्री करत आहेत. तसेच काही जनावरे कत्तलीसाठी आणण्यात आली आहेत.

माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून ९ आरोपींना ताब्यात घेतले. त्यात पुढील आरोपींचा समावेश आहे.

१) नासिर शहा दिलावर शहा वय ४१ वर्ष,( २) शब्बीर शहा दिलावर शहा वय ३२ वर्ष, ( ३) अबरार शेख अन्सार मन्यार वय २६ वर्ष, (४) शेख रफीक शेख इसाक, वय ३८, ०१ ते ४ रा.३६ खोल्या, फातेमा नगर, जळगाव.  (५) अकबर सत्तार खाटीक वय ४९ वर्ष, (६) आदिल शरीफ चौधरी, वय ३४ वर्षे, व्यवसाय-खा. नोकरी ,(७) सोहेल शरीफ चौधरी, वय 30 वर्षे, घर क्रमांक 05 ते 07, राम नगर, एमआयडीसी, जळगाव, (८) परवीन मुक्तार कुरेशी वय ३५ वर्ष, (९) मुक्तार जमाल कुरेशी, वय ४०, ए. क्रमांक ८ व ९, आर. ३६ खोली, फातेमा नगर, जळगावआरोपींना ताब्यात घेण्यात आले. काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.यातील परवीन कुरेशी हिच्यावर या आधीही अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून ३ गायी, १ बैल, १ गोरे, २ लहान वासरे तसेच सुमारे २०० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले. याशिवाय जनावरे व मांस वाहतूक व विक्रीसाठी वापरलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली.
दरम्यान, कत्तलीसाठी आणण्यात आलेली काही गायी, वासरे व इतर जनावरे सुरक्षितरित्या कुसुंबा येथील रतनलाल सी. बाफना गोशाळा येथे हलविण्यात आली आहेत. जनावरांची योग्य काळजी घेण्यात येत असून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत एकूण १२,२०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३२५, २७५ तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम ५, ५(क), ९ आणि ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप.नि हरेष पाटील करीत आहेत.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ विभाग केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांचे नेतृत्वात पो.उपनिरी/ रविंद्र तायडे, पो उप नि.हरेष पाटील, सफौ शरद सोनार, सफौ राजेश मेंढे, पोहेकॉ चंद्रकांत पाटी, पोहेकॉ गुणवंत देखमुख, पोहेकॉ/प्रशांत विरणारे, पोहॅको कमलाकर बागुल, पोकॉ भरत बाविस्कर, पोकॉ पंकज सोनवणे, पोकॉ
विठ्ठल मुंढे, पोकॉ सागर बिडे,पोको विजय अहिरे, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ रामकृष्ण माळी या पथकाने उत्कृष्ट अशी उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!