जळगाव जिल्ह्यातही घेतलायं ५२९ पुरुषांनीही “लाडकी बहीण” योजनेचा लाभ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा जळगाव जिल्ह्यात ५२९ पुरुषांनी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती किंवा प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेत या पुरुषांनी या योजनेत घुसखोरी केल्याचे पडताळणीत उघडकीस आले. जळगाव जिल्ह्यात तब्बल ५२९ पुरुषांनी स्वतःला महिला दाखवून या योजनेचा लाभघेतल्याचे समोर आले असून, आता महिला व बाल विकास विभागाने संबंधितांकडून लाभाची संपूर्ण रक्कम वसूल करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
संबंधित पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाईल. असे महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, फसवणूक सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचेही संकेत मिळत असून काही प्रकरणांत संबंधितांनी मध्यस्थांचा वापर केल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
जळगाव ११७
चाळीसगाव २०
भडगाव. ३६
चोपडा ३१
पाचोरा. ३०
पारोळा. ३०
भुसावळ. २८
अमळनेर. २७
जामनेर. २६
धरणगाव. २४
रावेर २३
यावल २०
मुक्ताईनगर १९
एरंडोल १६
बोदवड १२
विशेष म्हणजे, या योजनेतील घुसखोरीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पुरुष असले तरी जळगाव तालुक्यातील पुरुष लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ११७ घुसखोरांसह अशा लाभार्थीचे शतक पार करणारा जळगाव हा जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी यादीची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येत असून, इतर तालुक्यांतही अशीच प्रकरणे आहेत का. याचा शोध घेतला जात आहे.

