भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

ब्रेकिंग : ऐन निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, मद्यविक्री बंद चे आदेश असताना सावद्यात दुकाने सुरूच

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल का?

सावदा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 19 ते 21 डिसेंबर दरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असताना सावदा येथे देशी, बियरबार, रेस्टो बार अशी सर्व प्रकारची दारूची दुकाने खुलेआम सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मद्य विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवली आहे. संबंधित अधिकारी झोपले आहेत का? की झोपेचे सोंग घेत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी अशीही मागणी या निमित्ताने पुढे येत आहे .या संदर्भात दारू उत्पादन शुल्क अधिकारी रमेश राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल क्रमांक बंद होता.

राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील 09 प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील काही जागांवर सुधारीत निवडणुक कार्यक्रमानुसार मतदान पार पडणार आहे. या नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती 19 डिसेंबर मतदानाचा अगोदरचा दिवस, 20 डिसेंबर मतदानाच्या दिवसापर्यंत संपुर्ण दिवस तसेच 21 डिसेंबर मतमोजणीचा दिवस मतमोजणी प्रक्रिया संपे पर्यंत जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुर्णी, वरणगाव आणि यावल या नगरपरिषद आणि नगरपंचायत हद्दीतील ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.) यांनी दिले आहेत. या आदेशाचे जळगांव जिल्हयातील संबधीत सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी काटेकोर पालन करावे. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाचे उल्लघंन करतील, त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. असे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले असताना रावेर तालुक्यातील सावदा येथील  देशी, बियरबार, रेस्टो बार अशी सर्व प्रकारची दारू विक्री दुकाने खुले आम सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली असून यांचेवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. रावेर यावल तालुक्यात अशी बहुतेक दारू विक्री दुकाने सुरूच आहेत. या सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना मद्य विक्रेत्यांनी मद्य विक्री सुरूच ठेवली असताना संबंधित अधिकारी झोपले आहेत का? की झोपेचे सोंग घेत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी अशीही मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!