भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

डुक्कर दुचाकीसमोर आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिनांक २० जून शुक्रवार रोजी भुसावळ शहरातील ऑर्डनस फॅक्टरी रोडवरील साईबाबा मंदिरासमोर सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास डुक्कर आडवे येऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण मंगेश बिजगारे याचा जागीच मृत्यू झाला.

भुसावळ शहरातील मंगेश दिलीप बिजागरे (वय ३५, रा. काशीराम नगर, भुसावळ) या तरुणाच्या दुचाकीसमोर
शहरातील ऑर्डनस फॅक्टरी रोड वरील साईबाबा मंदिरासमोर सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास डुक्कर आडवे आल्याने मंगेश बिजगारे याचा जागीच मृत्यू झाला.

मंगेशचा मृतदेह भुसावळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. या अपघातात मंगेश चा मृत्यू झाल्याने काशीराम नगर परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस कॉ. गजानन बडगुजर हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!