भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

सावदा – फैजपूर सह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा- फैजपूर ,जळगाव शहरा सह जिल्ह्यात आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अरबी समुद्र आणि लक्षद्विप येथे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

काल अवकाळी पावसाबाबत जिल्हाधीकारी यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

राज्यात ३ डिसेंबर पर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यात १ डिसेंबरला पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आज दुपारी पावसाने हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!