भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिकसामाजिक

सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी अभिजात भाषा सप्ताहांतर्गत व्याख्यान

ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी अभिजात भाषा सप्ताहांतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले.


महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापिका मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील ह्या प्रमुख व्यक्त्या होत्या. त्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाचा सहभाग आहे. यातूनच मराठी भाषा टिकविण्याचे कार्य केले जाते कोणतीही भाषा ही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. प्रत्येकाला आपल्यावर भाषेतून अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. हे सामर्थ्य असल्याने कोणीही आपल्या भाषेला कमी समजू नये. भारत सरकारने लोकसभेत 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरव केल्याबद्दल स्वत: आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले.


मराठी भाषा ही दोन हजार वर्षं जुनी असून त्या काळापासूनचे मराठी भाषेतील ताम्रपट, शिलालेख, ग्रंथसंपदा उपलब्ध आहेत. हे अतिशय पुरातन असून आजपर्यंत मराठी भाषेत सतत उत्कृष्ट कलाकृती साहित्यकृती आकारास येत आहेत. ज्ञानेश्वरांच्या काळातील ज्ञानेश्वरीपासून साहित्य निर्मितीची नोंद घेतली असता आज पर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण झालेले आहेत. साहित्य निर्मितीची प्रक्रिया ही सातत्याने सुरू आहे.’ असे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. प्रा. प्रदीप तायडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.अक्षय महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!