भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

“मुक्ताईनगर येथे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी”

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मध्ये आद्य कवी महर्षी वाल्मिकी उत्सव समिती द्वारा असा निर्णय घेण्यात आला की यावर्षी सर्वत्र ओला दुष्काळ पडलेला असून समाजातील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे यंदा होणारा महर्षी वाल्मिकी उत्सव, तथा मिरवणूक रद्द करून सामाजिक जाणीव जागृती लक्षात घेऊन साध्या पद्धतीने महर्षी वाल्मिकी जयंती पूजन करून साजरी करायची आहे त्यामुळे समाजातील सर्व मान्यवरांनी या ठरावाला पाठिंबा देऊन केवळ प्रतिमेचे पूजन करून अतिशय साध्या पद्धतीने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली.


सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर श्री दिवाकर पाटील, डॉक्टर श्री दिलीप तायडे, माजी प्राचार्य श्री उमाकांत सूर्यवंशी, श्री पंकज कोळी भाजपा तालुकाध्यक्ष, श्री चंद्रकांत भो़लाणे, एड. श्री संतोष कोळी,श्री भगवान भाऊ भोलाणे, श्री उमेश कोळी, श्री सुरेश कोळी सर, श्री रामधन कोळी, श्री अशोक भाऊ कांडेलकर निमखेडी, श्री सुकलाल कोळी, श्री संजय कांडेलकर, श्री संतोष कोळी माजी नगरसेवक, श्री निलेश शिरसाट माजी नगरसेवक, श्री भास्कर कोळी, श्री गणेश कोळी, श्री संजय बावस्कर, श्री खिरोळकर आप्पा, श्री शुभम तायडे श्री विष्णू कोळी, श्री दीपक कोळी, श्री गौरव कोळी, श्री गौरव कोळी श्री संजय मधुकर कोळी तथा समाजातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!