मुक्ताईनगर – भुसावळ रोडवरील मुक्ताई पॅलेस समोरील “तो” जीव घेणा खड्डा अखेर पत्रकारांनीच बुजविला
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील मुक्ताई पॅलेस समोर असलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे अनेक दिवसांपासून वाहनधारक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यामुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले होते. अखेर आज मुक्ताईनगर तालुक्यातील पत्रकारांनी या जीव घेणाऱ्या खड्ड्याला” भावपूर्ण निरोप देत अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेल्या पत्रकारांनी हा स्तुत्य उपक्रम केल्याने पत्रकारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पत्रकारांनी या ठिकाणी स्वखर्चातून हा खड्डा बुजवला आहे यामुळे परिसरातील नागरिकांकडून पत्रकारांचे कौतुक करत प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे या प्रसंगी पत्रकारांनी संतप्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की “रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाची उदासीनता हीच अपघातांची खरी कारणे आहेत. अशा या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत, आणि तरीही संबंधित विभाग गप्प का आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे
मात्र पत्रकारांच्या अशा या अनोख्या आंदोलनाकडे झोपलेले स्थानिक प्रशासनाला जाग येईल का? आणि नागरिकांचे होणारे हाल थांबतील का असाही प्रश्न परिसरातील वाहनधारकांकडून व नागरिकांकडून केला जात आहे. यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार व परिसरातील नागरिक खड्डा बुजवण्याच्या मदतीसाठी उपस्थित होते
*
