Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबुलढाणा

मामाच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मलकापूर, जि. बुलढाणा (संकेत पवार) : तालुक्यातील मौजे हरसोडा अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अतिप्रसंग केल्याची घटना शनिवारी घडली . या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दि . २० पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत .

यासंदर्भात अधिक माहिती अशी , पिडीता अल्पवयीन मलकापूर तालुक्यातील मौजे हरसोडा येथे मामाच्या घरी आईसमवेत १० दिवसांसाठी आली होती . सारंगधर प्रभाकर कहाते वय २२ हा पिडीता अल्पवयीन मुलीच्या मामाच्या शेजारी राहतो . पिडिता शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदरीत शौचास जात होती . तेवढ्यात सारंगधर कहाते हा आला त्याने पिडीतेचा हात धरला व त्याच्या घरात घेवून गेला . हा प्रकार बघून मामेबहीण पळून गेली . सारंगधर याने पिडीतेचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग केला . आरडाओरड ऐकून दरवाजावर काहींनी थापा मारण्याचा आवाज ऐकल्यावर सारंगधरने दरवाजा उघडला व पळ काढला . या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी सारंगधर प्रभाकर कहाते याच्या विरुद्ध अपराध नं . १८७ / २०२१ कलम ३७६ ( ३ ) ५०६ भादवीसह बलात्कार व ४८ बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दि . २० पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत .. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करित आहेत .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!