भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण; लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके |मुक्ताईनगर शहरातील श्रीराम नगर (भिलवाडी) भागातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पवन मोहन गोसावी याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:
फिर्यादी सौरव संजय वाघ (वय २०, रा. भिलवाडी, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास त्यांची १७ वर्षीय लहान बहीण घरातून बाहेर गेली होती. ती बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. यावेळी फिर्यादीच्या मोठ्या बहिणीला फोनद्वारे माहिती मिळाली की, परिसरातीलच पवन मोहन गोसावी याने पीडित मुलीला आपल्या मोटारसायकलवर बसवून कुठेतरी नेले आहे.
कुटुंबीयांनी तात्काळ मुक्ताईनगर शहर, भुसावळ रोड आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र ती कोठेही मिळून आली नाही. संशयित आरोपी पवन गोसावी यानेच लग्नाचे आमिष दाखवून किंवा काहीतरी प्रलोभन देऊन तिला कायदेशीर पालकांच्या रखवालीतून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर सौरव वाघ यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस कारवाई:
या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पवन मोहन गोसावी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा (रजि. नं. ०१९७/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!