भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

मंडे टु मंडे न्युज चे भाकित खरे ठरले..!सावदा नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार लेवा समाजाची सून

सावदा, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज चमू | राज्यात नगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून सावद्याच्या राजकारणात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत संपली असून कोण कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करणार? नगराध्यक्षा पदासाठी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार? काय घडणार या बाबत मोठी उत्सुकता वाढली असताना सावदा नगराध्यक्षपद राखीव झाल्याने त्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या बाजूने इच्छुकांच्या चाचपणीसह मतदारांच्या मनाचा ठाव घेण्यात आला. नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती साठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या इच्छा – आकांक्षावर पाणी फिरले आहे. असे असले तरी अनुसूचित प्रमाणपत्र असलेल्या लेवा समाजाची सून असलेल्या महिलेला नगराध्यक्षा पदाची उमेदवारी दिली जाणार असे भाकित “मंडे टु मंडे न्युज” ने दिले होते.

सावदा नगरपरिषद निवडणुकीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गासाठी राखील आहे. सावदा नगरपालिका निवडणुकीत अनेक मोठ्या घडामोडी होणार, या घडामोडीमध्ये सावदा पालिकेतील राजकारणाला कलाटणी मिळणार .. यंदाच्या निवडणुकीत अनिसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेल्या जागेसाठी लेवा समाजाची अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रमाणपत्र असलेली सून नगराध्यक्ष पदाची प्रबळ पक्षाकडून उमेदवार होणार. “भाकरी फिरणार, सावदा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी साठी लेवा समाजाची सून
मैदाना उतरणार” अशा आशयाची बातमी “मंडे टु मंडे न्युज” ने दिनाक १४ ऑक्टोबर रोजी दिली होती.

मंडे टु मंडे न्युज चे भाकित खरे ठरले
सौ . रेणुका राजेंद्र पाटील या लेवापाटील समाजाच्या सुनेला भारतीय जनता पार्टीने अनुसूचित जाती प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!