भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूकित वादळापूर्वीची शांतता? मात्र पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू?

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | मुक्ताईनगर नगरपंचायतीची यंदा होऊ घातलेली निवडणूक काही दिवसांवरून येऊन ठेपली आहे अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना सुद्धा कुठलेही पक्षाकडून सध्या अधिकृत एबी फॉर्म चे वाटप झाले नसून सध्या Wait &watch च्या भूमिकेत सर्वच राजकीय पक्ष असल्याचे दिसून येत आहे. मुक्ताईनगर मतदार संघ हा गेल्या 40 वर्षापासून आमदार एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला मानला जात होता परंतु मागील दोन विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांचा विजय झाल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे .तसेच सावदा रावेर व मुक्ताईनगर नगरपंचायतीची धुरा शिवसेना शिंदे गटाने आमदार चंद्रकांत पाटील यांना सोपविली आहे.

भाजप सह शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सध्या सावध भूमिका?

भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सध्या उमेदवाराची चाचपणी सुरू असून नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदासाठी कोण उमेदवार हे सध्याही दोन्ही पक्षाकडून जाहीर करण्यात आलेले नाही दोन्ही पक्षाकडून आमच्याकडे सर्व उमेदवार असून एबी फॉर्म सहीत शक्ती प्रदर्शनासहित आम्ही फॉर्म भरू असे दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!