नगरपालिका निवडणुक : सावदा नगरपालिकेच्या २० जागांसाठी १० प्रभागात, तर रावेर नगरपालिकेच्या २४ जागांसाठी १२ प्रभागात आरक्षण जाहीर
सावदा/रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील येत्या नगरपरिषद निवडणुकीसाठी सावदा शहरासाठी प्रभाग आरक्षण व रावेर शहरासाठी आरक्षण आज बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आले.
सावदा शहरासाठी नगरपरिषद सभागृहात १० प्रभागासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. तर रावेर येथे नगरपालिका मंगलकार्यालयात एकूण १२ प्रभागासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
रावेर व सावदा येथे ‘अ’ आणि ‘ब’ या गटांनुसार पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार काही प्रभाग सर्वसाधारण (जनरल), काही अनुसूचित जाती (एस.सी.) तसेच काही इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
सोडतीनुसार सावदा नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे —
प्रभाग क्र. १: (अ) अनुसूचित जमाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. २: (अ) ना.मा.प्र., (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ३: (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४: (अ) ना.मा.प्र., (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ५: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण (उघड प्रवर्ग)
प्रभाग क्र. ६: (अ) ना.मा.प्र. महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. ७: (अ) ना.मा.प्र. महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८: (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. ९: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. १०: (अ) ना.मा.प्र., (ब) सर्वसाधारण
या आरक्षण प्रक्रियेत महिलांसाठी दहा पेक्षा अधिक जागा राखीव झाल्या असून, हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने सावदा नगरपालिकेत १० महिला नगरसेवक व नगराध्यक्ष हे महिला आरक्षण निघाल्याने १० महिला नगरसेविका व एक महिला नगराध्यक्ष अशा ११ महिला सावदा नगरपालिकेत विराजमान होणार.
सावदा नगरपालिकेची आरक्षण सोडत प्रक्रिया उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली.

रावेर नगरपालिका
तर रावेर नगरपालीसाठी २४ नगरसेवकांच्या जागांसाठी १२ प्रभागातून आरक्षण काढण्यात आले.
प्रभागाचे आरक्षण पुढीलप्रमाणे:
प्रभाग १- अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब )सर्वसाधारण महिला
प्रभाग २ -अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब )सर्वसाधारण महिला
प्रभाग ३ – अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब )सर्वसाधारण महिला
प्रभाग ४ -अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला),ब)सर्वसाधारण
प्रभाग ५ -अ )अनुसूचित जाती, ब ) सर्वसाधारण महिला
प्रभाग ६ -अ )सर्वसाधारण महिला
ब )सर्वसाधारण
प्रभाग ७ -अ )सर्वसाधारण महिला
ब )सर्वसाधारण
प्रभाग ८ -अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब )सर्वसाधारण
प्रभाग ,९ -अ)सर्वसाधारण महिला ब)सर्वसाधारण
प्रभाग १० – अ )अनुसूचित जाती (महिला) ब)सर्वसाधारण
प्रभाग ११ -अ)अनुसूचित जमाती (महिला), ब)सर्वसाधारण
प्रभाग १२ -अ )नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), ब )सर्वसाधारण “
रावेर नगरपालिकेत २४ पैकी १२ जागा महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या असून उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड -यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हे आरक्षण सोडत काढण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
