भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

८० हजारांची लाच : सरपंच व सदस्यासह तिघांना बेड्या, जळगाव जिल्ह्यात खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव मध्ये मोठी कारवाई केली आहे. शहरातील शासकीय कंत्राटदाराला हस्तांतर करारनामा करून देण्यासाठी एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या सरपंचाने ८० हजारांची लाच मागितली होती. या संदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जळगावच्या काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला व खाजगी पंटराच्या माध्यमातून लाच स्वीकारताच तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. या अटकेतील आरोपींमध्ये रिंगणगाव सरपंच भानुदास पुंडलिक मते (खोंडेवाडा, ता.एरंडोल), सदस्यपती समाधान काशीनाथ महाजन (३८, युनियन बँकेजवळ, एरंडोल) व संतोष नथ्थू पाटील (४९, कल्याणेहोळ, ता.धरणगाव) यांचा समावेश आहे. या कारवाईने ग्रामपंचायतीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेत एक कोटी ५० लाख २३ हजार ३२१ रुपयांचे काम केले आहे व एक कोटी २७ लाख २३ हजार ३२१ रुपयांचे बिल प्राप्त झाले आहे तर उर्वरीत २३ लाख रुपये प्रलंबित असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रकरण सादर केले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेले काम ताब्यात घेण्यासाठी सरपंच यांचा करारनामा अपूर्ण असल्याने देयक प्रलंबित होते. सरपंच भानुदास मते व सदस्य पती भानुदास महाजन यांची ६ ऑक्टोबर रोजी भेट घेतल्यानंतर त्यांनी हस्तांतरनामा देण्यासाठी एक लाखांची लाच मागिली व ८० हजार रुपये स्वीकारण्यावर तडजोड केली. ७ रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर संतोष नथ्थू पाटील याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचा इशारा केल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर सरपंच व सदस्य पतीला एसीबीकडे बेड्या ठोकल्या.

सदरची कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योेगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, ग्रेडेडे पीएसआय सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!