भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

रेल्वे प्रवाशांसाठी बातमी : दोन अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या नागपूर ते नाशिक धावणार, भुसावळ सह “या” ठिकाणी असणार थांबा..

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रेल्वे विभागानं नागपूर ते नाशिक रोड दरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाडी चालविण्याचा मोठा निर्णय घेतला असून जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाहांना या रेल्वे गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे या रेल्वे गाड्या भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत.

२३ व २४ जुलै रोजी धावणार, या महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर असणार थांबा
रेल्वे गाडी क्र. ०१२०६ ही एकेरी विशेष अनारक्षित गाडी २३ व २४ जुलैला नागपूरहून सायंकाळी ७:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता नाशिक रोड स्थानकात पोहोचेल. नागपूर ते नाशिक या दरम्यान या गाड्या नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड या रेल्वे स्थानकावर या गाड्या थांबणार आहेत.

तसेच या रेल्वे गाडी मध्ये १६ सामान्य तर २ एसएलआरडी कोच (गार्डसह लगेजची वाहतूक करणारे कोच) असे एकूण १८ अनारक्षित कोच असतील. त्यात १६ सामान्य तर २ एसएलआरडी कोचचा (गार्डसह लगेजची वाहतूक करणारे कोच) समावेश असणार आहे.

विशेष म्हणजे या गाडीला ऑनलाईन रिझर्वेशनची सुविधा नाही. ही गाडी पूर्णतः अनारक्षित स्वरूपात असल्यामुळे अगदी ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही या गाडीचे तिकिट काढता येणार आहे. या गाडीला ऑनलाईन रिझर्वेशनची सुविधा नसल्याने प्रवाशाना आपली तिकिटे रेल्वे स्थानकावरच जाऊनच काढता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!