भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

बोलेरो ची दुचाकीला धडक,पाल- मोरव्हाल फाट्याजवळ अपघात, तीन गंभीर

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शेतात कामासाठी निघालेल्या मजुरांच्या बोलेरो आणि दुचाकी यांच्यात जोरदार अपघात होऊन त्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रावेर तालुक्यातील पाल गावाजवळील मोरव्हाल फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेला चार वर्षीय बालक मात्र अपघातात थोडक्यात बचावला.

एम.एच. १९ सी.एन. ७१५० या क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतात जाणाऱ्या जखमींमध्ये पाल येथील रुबाब सबाज तडवी, गुलशान मुकद्दर तडवी आणि हसीना फकीरा तडवी यांचा अपघातात समावेश आहे.यांची दुचाकी व मध्यप्रदेशातील खरगोन रोडवरून मजूर घेऊन येणारी महिंद्रा बोलेरो (एम.पी. १२ जी.ए. १६१८) क्रमांकाची चारचाकी वाहनाने मोरव्हाल फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

जखमीना तात्काळ खासगी वाहनाने फैजपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून बोलेरो वाहनातील चालक व मजूर फरार झाले असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!