२० हजारांचा १ गोऱ्हा, १०० किलो कच्चे मास, ४० हजाराचा मुद्देमाल यावल पोलिसांच्या ताब्यात, ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गोमास कत्तलीतील प्रमुख आरोपी शांतता कमिटी सदस्याचा मुलगा..?
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | २० हजार किमतीचा १ गोऱ्हा तसेच २० हजार रुपये १०० किलो कच्चे गोमास व इतर साहित्य असा एकूण ४० हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन ४ जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण यावल शहरात आणि शांतता कमिटी सदस्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

गोमास कत्तलीतील प्रमुख आरोपी हा शांतता कमिटी मधील प्रख्यात ज्येष्ठ सदस्याचा आणि एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा / जवळचा नातेवाईक असल्याने तसेच दोन दिवसापूर्वी ॲडिशनल पोलीस अधीक्षक गावित यांच्या उपस्थितीत यावल येथे शांतता कमिटी सदस्यांची बैठक झाली होती त्यामुळे शांतता कमिटी सदस्यांसह संपूर्ण यावल पोलीस स्टेशन हद्दीत मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दि.२९ रोजी २:३० ( रात्री ) वाजेच्या सुमारास यावल पोलीस स्टेशन पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट नंबर २८७ अ मधील रियाज खान हाजी शब्बीर खान याचे कब्जातील पत्री शेडमध्ये अरबाज खान अजमल खान रा. खिर्निपुरा यावल, व त्याचे सोबत एक अनोळखी इसम याच्या मदतीने दोन गोवंश जनावरे कतलीच्या उद्देशाने विरवली तालुका यावल येथून पाई चालत सदर सेट मध्ये आणून त्याचे पैकी एका गोवांश गोऱ्हाची जावेद खान नजीर खान कुरेशी रा.डांगपुरा यावल याचे मदतीने कत्तल करून २० हजार रुपये किमतीचे १०० किलो गोमास बाळगताना मिळून आला असून त्या शेडमध्ये वीस हजार रुपये किमतीचा एक जिवंत गोवंश गिर जातीचा तपकिरी रंगाचा गोऱ्हा कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आला आहे म्हणून रियाज खान हाजी शब्बीर खान, अरबाज खान अजमल खान, जावेद खान नजीर खान आणि एक अनोळखी इसम या चार जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला

