भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

नशिराबादमध्ये अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांची धाड; २५ किलो गोमांस जप्त

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद पोलिसांनी अवैध गोमांस विक्रीविरोधात कारवाई करत सुमारे २५ किलो गोमांस जप्त केले असून एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सी.सी.टी.एन . एस. गु.र.नं. २१२/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम २७५, ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(सी), ९ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फातिमा नगर, ३६ खोल्या परिसरातील बंद टपरीच्या आडोशाला आरोपी मुक्तार जमाल कुरेशी (वय ४०) व परवीन मुक्तार कुरेशी (रा. फातिमा नगर, जळगाव) हे अंदाजे ₹५,००० किमतीचे २५ किलो गोवंशाचे सदोष मांस बेकायदेशीररीत्या कत्तल करून विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पुरुष आरोपी मुक्तार जमाल कुरेशी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. चंद्रकांत पाटील, सागर बिडे, भरत झांबिवकर, पंकज सोनवणे, प्रवीण लोहार आदींच्या पथकाने ही धाड यशस्वीरीत्या पार पाडली.या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!