ऑनलाइन सट्टा पेढीवर छापा, गुन्हा दाखल
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये अवैधरीत्या सट्टा पेढीवर पोलिसांनी छापा टाकून सट्टा खेळविणाऱ्या नरेंद्र सुरेश सोनार (वय ३९, रा. धनाजी काळेनगर याला अटक केली असून या छाप्यात १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार रोजी दुपारी भीमसिंग मार्केटमध्ये करण्यात आली.या प्रकरणी नरेंद्र सुरेश सोनार (वय ३९, रा. धनाजी काळेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील भीमसिंग मार्केटमधील महालक्ष्मी ऑनलाइन लॉटरी सेंटरवर ऑनलाइन सट्टा खेळवीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्या नुसार ऑनलाइन सट्टापेढी सेंटर वर छापा टाकून सट्टा खेळविणारा नरेंद्र सुरेश सोनार (वय ३९, रा. धनाजी काळेनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळन दोन हजार १५० रुपये रोख आणि सट्टा खेळविण्याचे साहित्य, असा सुमारे १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी गुन्हे शोधपथकातील सहाय्यक फौजदार सुनील पाटील, उमेश भांडारकर, योगेश पाटील, भगवान मोरे, राहुल कुमार पांचाळ आदी कर्मचाऱ्यांनी केली.
