भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

मुक्ताईनगर, भुसावळ व चाळीसगाव येथे डी.वाय.एस.पी. च्या नियुक्त्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दि. ३१ जुलै गुरुवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने प्रशासकीय कारणास्तव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनांबाबत आदेश काढले असून त्यात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, भुसावळ, आणि चाळीसगाव या तीन ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात २ रिक्त पदी तर जळगावचे संदीप गावित हे भुसावळ येथे जाणार आहेत.

राज्य शासनाने पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)” या संवर्गातील ६५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. त्यात जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांची भुसावळ शहर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.त्यांच्या रिक्तपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जळगाव जिल्ह्यात बाहेरून २ उपविभागीय पोलिस अधिकारी येणार असून त्यात काटोल उप विभाग नागपूर ग्रामीण येथून बापू गंगाधर रोहम तर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विजय ठाकुरवाड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!