भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

पाल परिसरात हिंस्र प्राण्याच्या प्राणघातक हल्लात बालक गंभीर जखमी

पाल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : रावेर येथील पाल परिसरात कंपार्टमेंटमध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालकांवर हिंस्र प्राण्याने प्राणघातक हल्ला केल्याने  बालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, मांजल येथील गुराखी दिपला बारेला आपल्या मित्रासोबत दररोज शेळी व गुरे चारण्यासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे बुधवार, दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. ६१ मध्ये गेला असतांना याठिकाणी दबा धरून बसलेल्या हिंस्र प्राण्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व त्यानंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले. सोबतच्या गुराख्यानी गावाकडे धाव घेत गावात जाऊन गावकऱ्यांना घडलेलल्या घटनेबाबत सांगितले. हल्ला करणारा प्राणी वाघ असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

गांवकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून हिंस्र प्राणी पसार झाला होता. यानंतर वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमी दिपला बारेला याला दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दिपला बारेला याच्या दोन्ही हातावर आणि पायावर हिंस्र प्राण्याची नखे लागली असून, कवटीला गंभीर दुखापत झालेली असल्याने सिटी स्कँन व पुढील उपचार करण्यासाठी जळगाव येथे रवाना केले असल्याची माहिती वैदकीय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!