रावेर

सावद्यात लागलेल्या आगीत दोन दुकाने जाळून खाक

सावदा,ता.रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या दुकानांना अचानक लागलेल्या आगीत दोन दुकाने जाळून खाक झाल्याची घटना सोमवार दि.८ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली.

रावेर तालुक्यातील सावदा येथील बस स्थानकासमोर असलेल्या गॅरेज ला प्रथम आग लागली,धुराचे लोट दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला,तो पर्यंत शेजारील दुकानाला देखील आग पसरण्यास सुरुवात झाली,लागलीच सावदा अग्निशामक दलाला पचारण करण्यात आले,शेवटी अर्ध्या- पाऊण तासात ही आग विझविण्यात यश आलं. या आगीत दुकानातील साहित्य, जूने टायर, इतर साहित्य मिळून हजारो रुपयाचं नुकसान झालं.या आगीवर वेळेत नियंत्रण केले नसते तर या दुकानांच्या रांगेत १५ ते २० दुकाने आहेत आग सर्वत्र पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती परंतु वेळेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठं अनर्थ टळला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!