भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चोपडासामाजिक

चोपडा येथे गणेश विसर्जन मार्गावरील समस्या तातळीने सोडवा – शिवसेना उभाठा चे चोपडा नगर परिषदेला निवेदन

चोपडा. मंडे टू मंडे न्युज. सचिन पाटील. ता.प्रतिनिधी | चोपडा शहरात येऊ बसलेल्या गणेश उत्सवानिमित्त चोपडा येथील गणेश विसर्जन मार्गावरील समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा तर्फे दिनांक 14/9/26 रोजी नगर परिषद चोपडा यांना निवेदन देण्यात आले.

शहरात उत्सवाचे वातावरण असून ज्या ज्या मुख्य भागातून मेन रोड गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत त्या ठिकाणचे रस्त्यांवर पडलेले खड्डे त्या रस्त्यांवरच्या उघड्या गटारीवरील धापे बसवणे पथ दिवे सुरक्षित करणे
व काही ठिकाणी नळ सोडण्याचे व्हाल जे आहेत त्यांचे पाईप काही प्रमाणात वरती आहे ते नीट कापणे व घोडगावकरच्या दुकानाजवळ गटारीवरील लोखंडाची फ्रेम तुटली असून ती सुरळीत करणे जेणेकरून कोणत्याही गणेश भक्ताला इजा पोचू नये व मिरवणूक चालू असताना कोणत्याही मंडळाला खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून बारीक स्वरूपाची कच टाकने. या स्वरूपाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चोपडे नगर परिषदेला निवेदन देण्यात आले.

काही ग्रामस्थांकडून चोपडे नगरपरिषद चोपडा यांच्या बद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे गणपती बसून आज तीन दिवस झाले असून देखील काम हे पूर्ण होत नसल्यामुळे आता दोन दिवसात गणपती विसर्जन होतील कारण चोपडा येथे पाचव्या दिवशी गणपती विसर्जन होत असतात. खेड्यापाड्यातील तसेच शहरातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते ते लक्षात घेता चोपडे नगरपरिषद यांनी तातडीने काम पूर्ण करावी अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे .शिवसेना जिल्हा महिला प्रमुख रोहिनी ताई यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी प्रकाश काका पाटील, अनिल दादा पाटील चोपडा विधानसभा संघटक प्रमुख प्रवीण भाऊ लोहार, मा. शिवसेना विभाग प्रमुख कमलेश बडगुजर,अनिल राजपूत, सुकलाल कोळी, चेतन लोहार,मयूर बडगुजर, महेंद्र नेवे, विवेक बडगुजर,निलेश बडगुजर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!