भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात दरोडे, दिवसाढवळ्या चोऱ्या, पत्रकाराच्या घरासमोरून मोटरसायकल लांबविली,पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह?

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मध्ये दरोडे पडत असून , दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच पत्रकाराच्या घरासमोरून मोटर सायकलची चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह? उपस्थित केले जात आहे.

याबाबत अधिकृत असे की मुक्ताईनगर शहरात व तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून श्री कॉलनी तसेच शहरात विविध भागात घरफोड्या, मोटर सायकल चोरी, दिवसाढवळ्या चैन चोरीच्या घटना घडत आहे. त्यातच दोन दिवसाआधी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपासह इतर पंपावर दरोडाच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे मुक्ताईनगर शहरातील नागरिक भयभीत झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे?

दिवसाढवळ्या पत्रकाराची मोटरसायकल लांबविली
शहरातील प्रवर्तन चौकाजवळ राहणारे स्टार भारत लाईव्ह चे पत्रकार सचिन झनके यांची मोटर सायकल भर दिवसा घरासमोरून चोरीस गेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!