भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर; ३२ ग्रामपंचायतींवर महिलाराज

यावल.मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींपैकी पेसा क्षेत्रातील चार ग्रामपंचायती वगळता उर्वरित ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये एकूण ३२ ग्रामपंचायतींची सरपंच पदे महिलांसाठी राखीव झाली आहेत.

यावल तालुक्यात एकूण ६७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी चार ग्रामपंचायती पेसा क्षेत्रात येत असून, तेथील जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे उर्वरित ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

यापूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतर मागासवर्गीय आरक्षणातून सर्वसाधारण झालेल्या १५ आणि इतर मागासवर्गीय अशा एकूण १६ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार बी. एम. पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे आणि सुयोग पाटील यांची उपस्थिती होती.

असे झाले सरपंच पदाचे आरक्षण
अनुसूचित जमाती राखीव :
बोराळे, वड्री खुर्द, कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, पाडळसे, साकळी, हंबर्डी, पिळोदे बुद्रुक, राजोरे.

अनुसूचित जमाती महिला राखीव :
कोरपावली, म्हैसवाडी, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द, चिखली बुद्रुक, चितोडे.

अनुसूचित जाती राखीव :
निमगाव, किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभूर्णी.

अनुसूचित जाती महिला राखीव : वनोली, दुसखेडे, न्हावी, अंजाळे.

नामाप्र राखीव : भालशीव.

नामाप्र महिला राखीव : दहिगाव.

सर्वसाधारण : महेलखेडी, हिंगोणे, आमोदे, नायगाव, सातोद, कासारखेडा, किनगाव खुर्द, विरावली, चिखली खुर्द, चिंचोली, शिरागड, सावखेडेसीसम, थोरगव्हाण, पिंपरूड, टाकरखेडे, बोरावल बुद्रुक.

सर्वसाधारण महिला राखीव :
अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, बोरखेडा बुद्रुक, डोणगाव, नावरे, कोळन्हावी, वढोदे प्र. यावल, आडगाव, भालोद, चुंचाळे, गिरडगाव, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र. सावदा, कोळवद.

एकूण ६३ ग्रामपंचायतींपैकी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदावर महिलांना संधी मिळणार असल्याने आगामी ग्रामपंचायत राजकारणात महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!