भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसावदा

सावद्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक,गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन

सावदा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज || आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) सायंकाळी जेहरा मॅरेज हॉल, सावदा येथे आयोजित करण्यात आली. जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बैठकीस मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी, तसेच सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड उपस्थित होते. याशिवाय सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील पत्रकार, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, सर्व पोलीस पाटील तसेच मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश मंडळांना पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना
बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशमूर्तीची उंची, वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे, गणेश आगमन सोहळा, विसर्जन मिरवणुकीचा मार्ग याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त परिपत्रके व आदेशांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गणेश मंडळांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या. संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही प्रशासन व पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, सर्व पोलीस पाटील यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव शांतता, सलोखा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांनीही शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर शांतता समितीची बैठक उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!