Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात खळबळ! आरएसएस च्या पथसंचलनावर दगडफेक, पोलिसांचा हस्तक्षेप; सौम्य लाठीमार, परिसरात तणावाचे वातावरण

यावल.मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पथसंचलनादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. पथसंचलन सुरू असताना विरोध करत दगडफेक करण्यात आल्याने या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. मात्र पोलीस बंदोबस्तात पथसंचलन सुरळीत पार पडले.

रविवारी (२५ ऑक्टोबर २०२६) सकाळी किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. हे संचलन सुरू असताना वाहतूक कोंडी करून पाथसंचाला विरोध करण्यात आला. या वरून दोन गटांत वादाची ठिणगी पडली.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि पथ संचलनावर  दगडफेक करण्यात आली. या गोंधळात काही समाजकंटकांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांवरही दगडफेक केली.
पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आणि गर्दी पांगली. सध्या घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.पोलिसांनी काही समाज कंटाकाना ताब्यात घेतले आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात अफवा पसरू नयेत, यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!