Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

उपचार घेऊन बाहेर पडताच तरुण कोसळला; यावल तालुक्यातील ३० वर्षीय युवकाचा रुग्णालयातच मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्यूज ||यावल तालुक्यातील कोळवद येथील एका ३० वर्षीय तरुणाचा जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उपचार घेऊन बाहेर पडत असताना अचानक चक्कर आल्याने हा तरुण जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तातडीने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

गौतम धर्मा भालेराव (वय ३०, रा. गंगापूर परिसर, कोळवद, ता. यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम भालेराव हे उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात गेले होते. तेथे डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्यानंतर त्यांनी औषध घेतले. त्यानंतर ते बाह्यरुग्ण विभागातून बाहेर पडत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ. निखील तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही नोंद पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!