भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव मध्ये खळबळ : गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्या वरून उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये सोमवारी (दि. १७ नोव्हेंबर) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून एका अंदाजे ४२ वर्षीय तरुणाने खाली उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे नागरिक आणि व्यापाऱ्यांची वर्दळ सुरू होती. याचवेळी एका तरुणाने अचानक चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. जमिनीवर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. गंभीर जखमी तरुणाला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
मृत तरुणाचे वय अंदाजे ४२ वर्षे असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही. जळगाव शहर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस करीत आहेत. घटनास्थळी हेड कॉन्स्टेबल सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, नंदू पाटील आणि राहुल पांचाळ यांनी पाहणी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!