भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

३५ टक्के रक्कम भरल्यानंतर शिलाई मशीन देण्याचे आमिष : ९० महिलांची लाखोंची फसवणूक

जळगाव. मंडे टु मंडे न्युज ||जळगाव तालुक्यात शिलाई मशीन देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९० महिलांची ३ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक ३५ टक्के रक्कम भरल्यानंतर फुल शटल मोटारसहित शिलाई मशीन मिळेलझाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिलाई मशीनच्या किमतीच्या ३५ टक्के रक्कम भरल्यास फुल शटल मोटारसहित मशीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महिलांकडून पैसे जमा करून घेतल्यानंतर मशीन न दिल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सपना संजय कोळी आणि संजय कोळी (सोनवणे), दोघेही रा. देवकर नगर, जळगाव यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सुरुवात भादली गावात लावण्यात आलेल्या एका जाहिरातीपासून झाली. ३५ टक्के रक्कम भरल्यानंतर फुल शटल मोटारसहित शिलाई मशीन मिळेल, असे आश्वासन देणारे पॅम्पलेट गावात लावण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये सपना कोळी आणि संजय कोळी यांनी भादली गावात जाऊन महिलांना या योजनेची माहिती दिली.

गावातील माधुरी भागवत मिस्तरी (वय ५०) यांना शिलाई मशीन मिळाल्याचे सांगून संशयितांनी त्यांच्यामार्फत इतर महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवली. तसेच, ओळखीतील महिलांचे अर्ज आणि पैसे जमा करून दिल्यास त्यांनाही मशीन मिळतील, असे सांगण्यात आल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. त्यानुसार माधुरी मिस्तरी यांनी नातेवाईक आणि परिचित अशा ९० महिलांना या योजनेची माहिती दिली.

या महिलांनी विश्वास ठेवून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात एकूण ३ लाख १० हजार रुपये संशयितांकडे जमा केले. पैसे भरल्यानंतर साडेतीन महिन्यांच्या आत शिलाई मशीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदत संपूनही एकाही महिलेला मशीन मिळाली नाही.

यानंतर माधुरी मिस्तरी यांनी सपना आणि संजय कोळी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली. मात्र, प्रत्येक वेळी मशीन देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे परत मागितल्यानंतर शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अखेर मशीनही मिळाली नाही आणि भरलेली रक्कमही परत न मिळाल्याने माधुरी मिस्तरी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून सपना कोळी आणि संजय कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!