भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

पाल येथे गांजाचा साठा जप्त ; ३ किलो २५० ग्रॅम गांजासह एकाला अटक

रावेर.मंडे टु मंडे न्युज || रावेर तालुक्यातील पाल येथे गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रावेर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका दुमजली घरावर छापा टाकत तब्बल ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील अंदाजे किंमत १ लाख ६५ हजार ५०० रुपये असून, या प्रकरणी मेहरबान जहाँगीर तडवी (वय ३६, रा. पाल, ता. रावेर) याला अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली अवैध गांजा विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली.

रावेर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, पाल येथील मेहरबान तडवी याने स्वतःच्या मालकीच्या दुमजली घरात विक्रीसाठी गांजा साठवून ठेवला आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी घराच्या प्रवेशद्वारासमोरील जिन्याजवळ विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला ३ किलो २५० ग्रॅम गांजा आढळून आला.

पोलिसांनी हा गांजा जप्त करून मेहरबान तडवी याला ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अमोल कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सेतुका तडवी, इस्माईल तडवी, विकार शेख आणि श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!