२१ वर्षांखालील तरुणांना दारू विक्रीवर कडक बंदी! लायसन जप्त होणार..!
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि सामाजिक शिस्त राखण्यासाठी, २१ वर्षांखालील तरुणांना दारू विक्रीवर कडक बंदी घालण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात असून, नियम मोडणाऱ्या दुकानांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
या नियमांचे उल्लंघन करून २१ वर्षांखालील व्यक्तींना मद्य विकताना आढळल्यास, विक्रेत्याचे लायसन्स जप्त करण्यापर्यंतची कठोर कारवाई केली जाऊ शकते.
२१ वर्षांखालील तरुणांना दारूची खरेदी करता येणार नाही. सरकारने विक्रीच्या नियमांतही कडक सुधारणा केल्या आहेत. दारू खरेदीसाठीचे कायदेशीर वय २१ वर्षे निश्चित केले आहे. आता सर्व मद्यविक्री केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना ग्राहकाच्या वयाची खात्री करणे बंधनकारक असेल. २१ वर्षांखालील व्यक्तींना दारू विकल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री Vijay यांनी राज्यातील दारू विक्री नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन निर्देशांनुसार २१ वर्षांखालील व्यक्तींना दारू विक्री करता येणार नाही. दारू खरेदीसाठी आलेल्या तरुणांचे वय संशयास्पद वाटल्यास ओळखपत्र तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीनांना दारू विक्री करणाऱ्या TASMAC दुकानांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सरकारने यापूर्वीच शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील ७१७ दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत होत असून, तरुणांमधील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
महाराष्ट्रात काय?
महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९’ (Maharashtra Prohibition Act) लागू आहे. महाराष्ट्रात बिअर (Beer) आणि वाईन (Wine) पिण्यासाठी किमान २१ वर्षे वय असणे आवश्यक आहे. परंतु, इतर हार्ड लिकर (उदा. व्हिस्की, रम, वोडका इत्यादी) पिण्यासाठी किमान वयोमर्यादा २५ वर्षे आहे. २५ वर्षांखालील तरुणांना हार्ड लिकर विकण्यास किंवा बारमध्ये सर्व्ह करण्यास कायद्याने कडक मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित हॉटेल किंवा बारवर परवाना रद्द करण्यापर्यंतची कठोर कारवाई केली जाऊ शकते. महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी किंवा जवळ बाळगण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) ‘मद्यसेवन परवाना’ असणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

